सोमेश्वरनगर येथील सर्वरोग निदान शिबिराचा ३९२ ऊसतोडणी मजुरांनी घेतला लाभ
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र वाघळवाडी येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ऊस तोड कामगार यांच्यासाठी दि २३ रोजी सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी ३९२ ऊसतोड मजुरांनी याचा लाभ घेतला तसेच चाळीस गरोदर मातांची तपासणी करण्यात आली यावेळी वजन-उंची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली महिलांना चिक्कीचे वाटप करण्यात आले तसेच ऊसतोड कामगारांसाठी चहा-बिस्कीट ची ही व्यवस्था करण्यात आली होती सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे यांचे नियोजनाखाली करण्यात आले यावेळी प्रा आ केंद्र होळ चे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रफुल्ल बाबर आरोग्य समुदाय अधिकारी डॉ योगिता माळी आरोग्य सेवक परवेश मुलाणी आरोग्यसेविका श्रीम शिंदे के के तसेच प्रा केंद्र होळचे इतर कर्मचारी व आरोग्य समुदाय अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमास आशा प्रकल्प च्या कार्यकर्त्यांची मदत झाली.