'वाणेवाडी'च्या इस्त्रीवाल्याचा प्रामाणिकपणा : इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यात सापडलेले ६ हजार केले परत

Admin
'वाणेवाडी'च्या इस्त्रीवाल्याचा प्रामाणिकपणा : इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यात सापडलेले ६ हजार केले परत

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----------------

बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावातील एका इस्त्रीवाल्याचा प्रामाणिकपणा आता चर्चेचा विषय बनला आहे. एका ग्राहकाची कपडे इस्त्रीसाठी आली असता त्याचा खिशात ६१२० रुपये आढळून आले. ते पैसे ग्राहकाला परत करत ईस्त्रीवाल्याने आपला प्रामाणिकपणा दाखवला आहे.  
          वाणेवाडी गावातील हरणाही चौकात संतोष भोसले यांचे गेल्या पंधरा वर्षांपासून सुपर लॉड्री हे दुकान आहे. वानेवाडीतीलच माध्यमिक शिक्षक अशोक भोसले यांनी आपली कपडे याठिकाणी इस्त्रीसाठी टाकली असता त्या इस्त्रीच्या कपड्यात लॉड्री चालक संतोष भोसले यांचे पुतणे विवेक भोसले याला त्याकपड्यात ६ हजार १२० रुपये आढळुन आले. विकेक भोसले याने ते पैसे शिक्षक अशोक भोसले यांना प्रामाणिकपणे परत केले. विवेक ने प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल शिक्षक अशोक भोसले यांनी विवेकला योग्य बक्षीस देत त्याचे आभार मानले.
To Top