सोमेश्वर ची चालू हंगामातील एफआरपी २८०८ रुपये : ऊसदराची कोंडी फुटली
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मागील गळीत हंगामात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दर
दिल्यानंतर सोमेश्वर कारखान्यांनी पुन्हा एकदा ऊस
उत्पादकांना जोरदार दिलासा दिला आहे आत्ताच
झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नुसार
कारखान्याने या चालू हंगामातील गाळपास येणाऱ्या
उसाला २८०८ रुपये एफ आर पी
देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत एफआरपी एकरकमी देणार येणार आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची आज अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत चालू
गळीत हंगामातील गाळपास येणाऱ्या उसाला किती
दर द्यावा यावर चर्चा झाली.