सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

'सोमेश्वर' करणार सभासदांच्या खात्यावर करणार एकरकमी एफआरपी जमा : वाचा सविस्तर काय निर्णय झाला संचालक मंडळ सभेत

'सोमेश्वर' करणार सभासदांच्या खात्यावर करणार एकरकमी एफआरपी जमा : वाचा सविस्तर काय निर्णय झाला संचालक मंडळ सभेत

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

 सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सन २०२०-२०२१ करीता गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाची प्रतीटन २८०८ रुपये  एकरकमी
एफ.आर.पी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
         सध्या कोरोना, लॉकडाऊन
अतिवृष्टी या ऐकापाठोपाठ आलेल्या अडचणीतून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने दि.३०/११/२०२० पर्यंत गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाची एकरकमी एफ.आर.पी. सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून लवकरच ही रक्कम सभासदांना अदा केली जाईल. अडीअडचणीच्या प्रत्येक वेळी सभासद व कारखाना हे दोघेही एकमेकांसाठी उभे
रहात असून "अभिमान याचा, सोमेश्वर माझा” या उक्तीप्रमाणे आपली संस्था वाटचाल
करीत असल्याचे गौरोउद्गार सभासदांमध्ये असून याचा आम्हा संचालक मंडळास सार्थ
अभिमान असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले. 
कारखान्याने आजअखेर २ लाख ८ हजार ३४५ मे.
टन ऊसाचे गाळप केले असून संपुर्ण पुणे जिल्ह्यात क्रमांक एकचा १०.३० टक्के साखर
ऊतारा मिळवीत २ लाख १० हजार ६०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तसेच
कारखान्याच्या को-जनरेशन मधून १ कोटी ९० लाख ५८ हजार ३३९ युनिट्स
विजनिर्मिती केली असून १ कोटी २७ लाख ३० हजार युनिट्स विज विक्री केली आहे.
त्याचबरोबर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून सरासरी २७२,४२ ची रिकव्हरी
मिळवत १४ लाख ९६ हजार ६०५ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून २ लाख
५५ हजार ९६ लिटर्स इथेनॉलची निर्मिती केलेली आहे.
आपल्या श्री सोमेश्वर कारखान्याकडे ३३ हजार
एकर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून या गाळप हंगामात अंदाजे १२ लाख मे.टनाच्या
आसपास गाळपासाठी ऊस उपलब्ध होण्याची शक्यता कारखान्याच्या शेतकी विभागाने
वर्तविली आहे. या हंगामात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आपणासमोर आहे. यापैकी काही
ऊस इतर कारखान्यांना देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असून उर्वरीत संपुर्ण ऊस
वेळेत गाळण्याचा संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे. कारखान्याकडे पुरेशी ऊसतोड
यंत्रणा दाखल झाली असून हार्वेस्टर यंत्राणेही सभासदांची ऊसतोड सुरळीत सुरु आहे.
 कारखान्याकडे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायमचा
निकाली काढण्यात येईल.
कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता
हंगामात ७५०० मे.टन प्रती दिनी वाढविण्याचा
निर्णय घेतला असून त्याबरोबर कारखान्याने डिस्टीलरीचा वाढीव प्रकल्प हाती घेवून
ज्यादा क्षमतेने इथेनॉल निर्मिती करुन सभासदांना अधिकचा मोबदला कसा देता येईल
याचाही संचालक मंडळ प्रयत्न करत आहे.गतवर्षीप्रमाणे आपणा सर्वांच्या सहकार्याने सुरु
असणारा सन २०२०-२०२१ चा हा गाळप हंगामही आपण सर्वच बाबतीत यशस्वीरित्या
पार पाडू असा मला विश्वास असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6982,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : 'सोमेश्वर' करणार सभासदांच्या खात्यावर करणार एकरकमी एफआरपी जमा : वाचा सविस्तर काय निर्णय झाला संचालक मंडळ सभेत
'सोमेश्वर' करणार सभासदांच्या खात्यावर करणार एकरकमी एफआरपी जमा : वाचा सविस्तर काय निर्णय झाला संचालक मंडळ सभेत
https://lh3.googleusercontent.com/-B8epwqhPw1Q/X8ipAAIR2eI/AAAAAAAAF2E/WgS35SNbPsYXorSzKLiExtvZBqnVr_KdACLcBGAsYHQ/s1600/1606985962361207-0.png
https://lh3.googleusercontent.com/-B8epwqhPw1Q/X8ipAAIR2eI/AAAAAAAAF2E/WgS35SNbPsYXorSzKLiExtvZBqnVr_KdACLcBGAsYHQ/s72-c/1606985962361207-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/12/blog-post_44.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/12/blog-post_44.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy