धरण उशाला कोरड घशाला : निरा डाव्या कालव्यावरील पिके जळू लागली
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या महिना ते दीड महिन्यापासून निरा डावा कालवा बंद असल्याने कोणी पाणी देता का पाणी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांसह नागरिकांवर आली आली.
यावर्षी निरा खोऱ्यात मुबलक पाऊस झाला मात्र निरा डावा कालवा महिन्याभरापासून बंदच असल्याने आता पिके जळू लागली आहेत. तर ग्रामपंचायतीच्या विहिरींना तळ गाठल्याने नागरिकांचे पिण्याचे पाण्याचे हाल सुरू आहेत. जेंव्हा अतिवृष्टीचा पाऊस सुरू होता, त्यावेळी कालवा भरून चालला होता मंग नक्की हे पाणी कुठे मुरले असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान निरा डाव्या कालव्यावर सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती हे तीन साखर कारखाने येतात, सद्या या साखर कारखान्यांचा साखर हंगाम सुरू असून या कारखान्यांना देखील पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. निरा डाव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभाग नक्की कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे. असा सवाल शेतकरी करत आहेत.