सोमेश्वर रिपोर्टर चा १० लाख वाचक संख्येचा टप्पा पूर्ण : वाचकांचे मनःपूर्वक आभार
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
प्रथमतः सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!......
गेल्या सहा महिन्यांपूर्वी पेपर छापाईच्या काही तांत्रिक कारणामुळे आम्ही एप्रिल महिन्यात सा. सोमेश्वर रिपोर्टर या वेबपोर्टल च्या माध्यमातून वाचकांपर्यंत जिल्ह्यातल्या अचूक वेध घेणाऱ्या घडामोडी पोहचविल्या. वाचकांनाही आमच्या वेब पोर्टलला भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या सहा महिन्यात आम्ही वाचकांपर्यंत राजकीय, उद्योग, शेती, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य
विविध क्षेत्रातील १ हजार १०० बातम्या पोचविल्या असून वाचकांच्या पाठबळावर आज आम्ही १० लाख वाचक संख्येचा टप्पा पार केला आहे. हे सर्व श्रेय वाचकांचे आहे मात्र आमच्या सोमेश्वर रिपोर्टर टीम मधील मुख्य संपादिका भारती जगताप, कार्यकारी संपादक दत्ता माळशिकारे, कायदेशीर सल्लागार adv. गणेश आळंदीकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध गावातील आमचे बातमीदार या सर्वांनीच लोकडाऊन च्या काळात तसेच लॉकडाउन नंतरही आम्ही बातम्यांमध्ये सत्यात राखत विविध बातम्या वाचकांपर्यंत पोचविल्या आहेत.
आज सा. सोमेश्वर रिपोर्टर ने १० लाख ८ हजार ५०० वाचक संख्या आहे. सोमेश्वर रिपोर्टरचे वाचक महाराष्ट्रासह जगभरात देखील आहेत. कुठल्या देशात सा. सोमेश्वर रिपोर्टर वाचला जातो याबाबत आम्ही गुगलने पाठवलेले डाटा अनालायसेस आपल्या माहितीसाठी देत आहोत.
.
-
COMMENTS