सोमेश्वर पाठोपाठ माळेगाव कारखाना देखील देणार एफआरपी ची पूर्ण रक्कम एकरकमी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
माळेगाव सहकारी साखर कारखाना सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाच्या बिलापोटी एफ.आर. पी.ची पूर्ण रक्कम देणार असून त्यानुसार सभासदांच्या बँक खात्यावर प्रति टन २४५९ रुपये जमा होणार आहेत. अशा प्रकारचा निर्णय संचालाक मंडळाच्या गुरुवार दि.०३ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी सांगितले.
आज दुपारीच सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाची मासिक सभा पार पडली यामध्ये २८०८ रुपये एफआरपी एकरकमी देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.