सोशल डिस्टन्सचे पालन करत मोरगाव ला चतुर्थी निमित्त भाविकांची मंदीयाळी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगांव ता . बारामती येथे लॉक डाऊन नंतर पहील्याच संकष्टी चथुर्तीच्या निमित्ताने आज मयुरेश्वर मंदिरात भावीकांची मंदीयाळी होती . पहाटे पाच ते रात्री उशीरापर्यंत हजारो भावीकांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली .
आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे पाच वाजता गुरव मंडळीचि प्रक्षाळ पुजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. यानंतर तालुक्यासह राज्यभरातील भावीकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती . सोशल डिस्टन्स , तोंडावर मास्क , हातावर सॅनिटायझर , व शारीरिक तापमानाची नोंद घेऊनच भक्तांना मंदिरात सोडले जात होते .
सकाळी ७ वाजता पुन्हा श्रींची धुपारती निघाली .तर दुपारी १२ वाजता नैवद्य दाखविण्यात आला . पुणे , सातारा , सांगली , कोल्हापुर , ठाणे , मुंबई या जिल्ह्यातुन भावीक दर्शनासाठी आले होते . चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने आजची होणारी गर्दी लक्षात घेता पिण्यासाठी पाणी , सुरक्षा रक्षक , सफाई कामगार आदी सोय उपलब्ध केली होती . ...........................................
राज्य शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करण्यासाठी जेष्ठ नागरीक , १० वर्शाखालील मुले व गरोदर मातांना मंदिरात दर्शनासाठी जाण्यास नाकारण्यात आले असुन पायरीवरुनच दर्शन घेण्यास सांगण्यात येत होते .