एम्स व बारामती नगरपरिषद यांचे मध्ये सामाजिक कार्यासाठी संयुक्त सामंजस्य करार

Admin
एम्स व बारामती नगरपरिषद यांचे मध्ये सामाजिक कार्यासाठी संयुक्त सामंजस्य करार

 
बारामती : प्रतिनिधी

बारामती नगरपरिषद, बारामती आणि अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या अनेकांत इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बारामती यांच्यामध्ये सामंजस्य करार नुकताच पार पडला.
       यावेळी बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा  पोर्णिमा तावरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, नगरपरिषद उपमुख्याधिकारी श्रीमती पद्मश्री दाईंगडे, अनेकांत इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे सचिव मिलिंद शहा (वाघोलीकर), संचालक डॉ.एम.ए.लाहोरी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व नगरपरिषदेतील सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून बारामती नगरपरिषदेच्या महत्वपूर्ण सामाजिक उपक्रमांचे पध्दतशीरपणे दस्ताऐवजीकरण व सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त असे सादरीकरण करण्यामध्ये एम्स प्रयत्नशिल असणार आहे.
To Top