महामार्ग पट्ट्यातील शिवरेमध्ये सर्वाधिक मतदान
भोर : प्रतिनिधी
माणिक पवार
पुणे – सातारा महामार्ग पट्ट्यातील गावामध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचे मतदान शांततेत व उत्साहात सरासरी ८५ टक्के मतदान झाले असून राष्ट्रवादी विरुद्ध कॉग्रेसमध्ये चुरस असलेल्या शिवरे येथे जवळपास ९० ट्ककेच्या पुढे मतदारांनी मोठया उत्साहात मतदान केले आहे. राजगड पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
शिवरे ( ता. भोर ) येथील ग्रामपंचायत निवडणूकमध्ये कॉग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी कॉग्रेस एकवटली असून तालुक्याचे पक्षश्रेष्ठीं आणि राष्ट्रवादीचे शंकरराव डिंबळे, तानाजी डिंबळे, दादा डिंबळे, रघुनाथ डिंबळे, पै. धनेश डिंबळे, डॉ. राजेंद्र डिंबळे, रामचंद्र डिंबळे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा ग्रामविकास पॅनेलने सुनील पर्वती डिंबळे, तेजश्री संदीप डिंबळे, विद्या किरण दळवी, निर्मला पंढरीनाथ डिंबळे, माधुरी राजेंद्र डिंबळे, अशोक बुचडे, अॅड प्रसाद अरुण डिंबळे, कल्याणी उत्तम डिंबळे या उमेदवारांनी लढत कॉग्रेसच्या भैरवनाथ पेनलच्या उमेदवारांना लढत दिली असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र होते.
शिवरेमध्ये मतदान अत्यंत चुरशीच्या परंतु शांततेत व उत्साहात पार पडले. प्रभाग क्रमांक एकमध्ये एकुण ४४१ पैकी ४१२ मतदान होऊन सरासरी ९३.४२ टक्के मतदान पार पडले तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये एकुण ५३६ मतदारापैकी ४८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावुन ८९.७४ टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये ७३७ पैकी ६६७ मतदारांनी हक्क बजावून ९०.५० टक्के मतदान झाले असून महामार्ग पट्ट्यातील शिंदेवाडी, वेळू, कामथडी, नसरापूर, केंजळ, सारोळा तसेच प्रत्येक मतदान केँद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
COMMENTS