आज पत्रकार संघाच्या तिळगुळ समारंभात राजकीय गप्पांचा रंगणार फड : सर्व दिग्गज एकत्र
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----------
बारामती तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज सायंकाळी साडेचार वाजता सोमेश्वर कारखान्यावर तिळगुळ समारंभ आयोजित केला आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकातून तावून सुलाखून निघालेले सख्खे सोबती व पक्के विरोधक आज सगळे वाद विसरून पत्रकार संघाच्या कार्यक्रमात गप्पा गोष्टी करणार आहेत. तसेच कारखाना निवडणूक तोंडावर आल्याने त्याही गप्पांचा फड रंगणार आहे.
विशेष म्हणजे दिल्लीत टिपेला पोचलेले आंदोलन आणि वादग्रस्त कृषी कायदे या ज्वलंत विषयावर प्रबोधनही होणार आहे.
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाद्वारे आपल्या सारख्या मान्यवरांच्या उपस्थीत तिळगूळ समारंभ आयोजीत केला आहे .सदर कार्यक्रमामधे
शेतकरी आंदोलन व कृषी कायदे या विषयावर चर्चासत्र होणार आहे. इंडियन एक्सप्रेसचे जेष्ठ कृषिपत्रकार पार्थसारथी बिश्वास हे मार्गदर्शन करणार आहेत.
यानिमित्ताने कोरोनाकाळात उत्कृष्ट जनसेवा केल्याबद्दल बारामती तालुका वैद्यकीय अझधिकारी डॉ मनोज खोमणे, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे स पो नि सोमनाथ लांडे, आजी माजी सैनिक संघटनेद्वारे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर
यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
वेळ सायंकाळी ४-३० वाजता
ठिकाण.. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना- प्रशासकीय ईमारतीसमोर होणार आहे.
COMMENTS