बारामतीत आज लसीकरणास सुरुवात : ११ वाजता शुभारंभ
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नमस्कार सर्व पत्रकार बांधवांना कळविण्यात येतेकी आज बारामतीमध्ये सकाळी 11 वाजता कोविड लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. महिला शासकीय रुग्णालय बारामती व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य सेवेतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना सिरम इन्स्टिट्यूट ची कोवीशिल्ड ही लस देण्यात येणार आहे एका सत्रामध्ये 100 याप्रमाणे आज एकूण 200 लोकांना लस देण्यात येणार आहे तसेच लाभार्थ्यांची निवड ही जिल्ह्यातून रॅन्डम पद्धतीने होणार आहे त्याचप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना एसएमएस आलेला आहे अशाच लाभार्थ्यांना लस दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
COMMENTS