कोऱ्हाळे ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सत्येत निश्चित बदल होणार : प्रदीप धापटे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोऱ्हाळे ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सत्येत निश्चित बदल होणार असल्याचे मत बारामती पंचायत समितीचे उपसभापती प्रदिप बापू धापटे यांनी व्यक्त केले
कोऱ्हाळे बु!! ता बारामती येथे श्री सिद्धेश्वर बहुजन विकास पॅनल च्या आभार सभेत बोलत असताना वरील मत व्यक्त केले गेल्या पाच वर्षांपूर्वी 36 तासात युवकांचा पॅनल उभा करून 23 टक्के मते घेतली होती त्यावेळी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना पराभव स्वीकारावा लागला आता गटाची ताकद वाढली आहे यावेळी सत्तेवर कोणाला बसवायचे हे आम्ही ठरवणार वार्ड क्रमांक एक मध्ये आमच्याच विचारांचे तीनही उमेदवार विजयी होऊन सत्तेकडे आम्ही वाटचाल करणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी काका धापटे यांनी संघर्ष करण्यास माणूस मोठा लागत नाही जिद्द लागते या जिद्दीच्या जोरावरच आपण विकासाची घोडदौड कायम ठेवू. यावेळी सीमा प्रकाश साळसकर प्राचार्य रॉयल इंटरनॅशनल स्कूल चाकण अमित शौकत शेख अशोक आबा माळशिकारे विनेश गाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून कोऱ्हाळ्याच्या जनतेसाठी आपले कार्यालय कायम कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली आणि उपस्थितांचे आभार संतोष शिरतोडे यांनी मानले.
COMMENTS