'सोमेश्वर' च्या ऊस वाहतूक संघटनेचा संप मिटला
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने आज पासून पुकारलेला संप कारखाना प्रशासन व संघटनेचे पदाधिकारी यांच्या चर्चेतून मिटला असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे यांनी दिली.
आज सकाळी दहा वाजता सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक किशोर भोसले, सचिन खलाटे, लक्ष्मण गोफने तसेच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे व इतर पदाधिकारी यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्यानंतर हा संप मिटला आहे. आज पासून वाहतूक सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने वाहतुकीत वाढी साठी संपाचे हत्यार उपसले होते. मात्र आज सकाळीची यावर तोडगा काढण्यात कारखाना प्रशासनाला यश आले आहे.
पुरुषोत्तम जगताप- अध्यक्ष सोमेश्वर कारखाना
माळेगाव व छत्रपती या कारखान्यासह राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी याबाबत तिन्ही कारखान्यांचे अध्यक्षांसोबत चर्चा घडवुन ऊस वाहतुक दरवाढीचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल.
प्रदीप काकडे - अध्यक्ष वाहतूक संघटना
ही संघटना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारला मानणारी संघटना असून सभासदांचे नुकसान टाळण्यासाठी हा संप आम्ही मागे घेत आहोत.
पोलीस बंदोबस्त
आज सकाळ पासूनच ट्रक आणि ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने संप पुकारला. त्यामुळे ऊस खाली करून आलेले मोकळे वाहन वाहनतळावर उभे केले जात होते. संपामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
COMMENTS