गाऊडदरामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पार
भोर : प्रतिनिधी
माणिक पवार
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज रविवारी ग्रामीण भागातील ५ वर्षाखालील बालकांना प्रतिबंधक लस देण्याची सुरवात आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. सरपंच पदाचे दावेदार प्रशांत गाड़े यांच्या हस्ते गाऊडदरा ( ता. हवेली ) यांच्या हस्ते येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले.
गाव पोलिओ मुक्त करण्यासाठी कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करून पालकांनी आपल्या पाच वर्षाखालील बालकांना नजीकच्या पोलिओ बूथ केंद्रावर नेऊन पोलिओ डोस पाजून घ्यावा, पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन प्रशांत गाड़े यांनी केले. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शुभारंभप्रसंगी आशा वर्कर अंजली गाड़े, व अंगणवाडी सेविका स्वाति सुर्वे उपस्थित होते. कोरोना विषाणू संक्रमण काळात वैद्यकीय कर्मचा-यांनी चांगले काम केले. नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यात ब-यापैकी यशस्वी झालो तरी अजून पूर्णपणे कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नसून नागरिकांनी कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे प्रशांत गाड़े यांनी सांगितले.