'सोमेश्वर' चे अध्यक्ष म्हणतात संपावर तोडगा काढू : वाहतूक संघटना मात्र संपावर ठाम

Admin
'सोमेश्वर' चे अध्यक्ष म्हणतात संपावर तोडगा काढू : वाहतूक संघटना मात्र संपावर ठाम

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----

दि २७ पासून सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने पुकारलेल्या संपावर संघटना ठाम असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे व्यक्त केले. 
          वाहतूक संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, याबाबत सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून या चर्चेत कोणताच तोडगा निघाला नाही.  त्यामुळे आम्ही वाहतूक बंद करण्याच्या निर्णयावर ठाम आहोत. सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांचे नुकसान टाळण्यासाठी कारखाना प्रशासन योग्य तो निर्णय घेईल असे अध्यक्ष प्रदीप काकडे यांनी सांगितले. 
            तर दुसरीकडे सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी वाहतूक संघटनेने पुकारलेला संप मागे घेण्याचे आवाहन केले असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तीन कारखान्याचे अध्यक्ष व वाहतूक संघटना यांच्यात चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
To Top