'लोणीभापकर' च्या उपसरपंचपदी सारिका विजय गोलांडे
लोणीभापकर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------------
येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सारिका विजय गोलांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच रविंद्र भापकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीची विशेष सभा बोलावण्यात आली होती.
उपसरपंचपदासाठी सारिका गोलांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने व तो वैद्य ठरल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रामराव चांदगुडे यांनी जाहीर केले. यापूर्वीचे उपसरपंच सौ. दिपाली सर्यवंशी यांनी ठरल्या प्रमाणे राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य दिपाली सूर्यवंशी, पदमनाथ कडाळे, अरुणा ठोंबरे, मनिषा गोलांडे, शोभा बारवकर, रुक्मिणी चोपडे, संतोष खैरे, सुदाम मदने,जयसिंग भापकर, बाळासो बारवकर, प्रदीप गोलांडे, आबा ठोंबरे, संजय सूर्यवंशी, संतोष चोपडे, उपस्थित होते. सारिका गोलांडे यांचा सत्कार सरपंच रविंद्र भापकर व माजी उपसरपंच दिपाली सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
COMMENTS