मुरूम येथे भरवण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ८० जणांची तपासणी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम येथे भरवण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ८० जणांनी तपासणी करत या शिबिराचा लाभ घेतला.
श्री मल्लिकाजून जेष्ठ नागरीक संघ मुरूम यांच्या वतीने या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या नीता फरांदे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक नामदेवराव शिंगटे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माणिकराव भिलारे, मुरूम चे मा उपसरपंच निलेश शिंदे, मधुकर फरांदे, गणपतराव फरांदे, भालसिंग कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात ८० जणांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पाच जणांना मोतीबिंदू ऑपरेशन साठी पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. या ऑपरेशन साठी येणारा खर्च जेष्ठ नागरिक संघाचे सल्लागार नामदेवराव शिंगटे यांनी उचलला आहे.