संकष्टी चतुर्थी निमित्त मोरगाव येथे हजारो भाविकांकडून मयुरेश्वराचे दर्शन

Admin
संकष्टी चतुर्थी निमित्त मोरगाव येथे हजारो भाविकांकडून मयुरेश्वराचे दर्शन

मोरगांव : प्रतिनिधी

अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथे आज नववर्षाच्या निमित्ताने व नव वर्षातील  पहिलीच संकष्टी चतुर्थी असल्याने हजारो भाविकांनी  श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती . पहाटे पाच ते  रात्री उशिरापर्यंत पन्नास हजार  भाविकांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली .


 आज  पहाटे  गुरव  मंडळींचे प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा सर्व भक्तांना दर्शनासाठी खुला करण्यात आला . दर्शनाच्या निमित्ताने  पुणे  ,सातारा ,सांगली ,अहमदनगर , मुंबई  ,वाशीम , सोलापूर  आदी भागातून भक्त आले होते . सण  2021 या नव  वर्षांमध्ये  आगामी अनेक संकल्पाच्या निमित्ताने भाविक  श्रींना साकडे घालत असताना असे आढळून येत होते . सकाळी सात व दुपारी बारा वाजता श्रींची महापूजा करण्यात आली. त्यानंतर रात्री चंद्रोदयाच्या वेळी  श्रींना  महानैवेद्य दाखवण्यात आला. दिवसभर  गर्दी चा  ओघ  जैसे थे सुरू होता . चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने आज होणारी   संभाव्य गर्दी लक्षात घेता सुरक्षारक्षक , सफाई कामगार , पिण्याचे पाणी  ,स्वच्छता आदी जय्यत तयारी केली होती.  करुणा या विषाणूने आजाराच्या पार्श्वभूमीवर थर्मामीटर च्या साह्याने सर्व भावीकांचे  शारीरिक तापमानाची   नोंद घेऊनच मंदिरामध्ये सोडले जात होते . याच बरोबर  तोंडावर मास्क लावणे व हातावर सॅनिटायझर घेणे    बंधनकारक केले होते .


 मंदिर सुरु झाल्यानंतर पहील्यांदाच भक्तांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसागर मोरगांव येथे पहावयास मिळाला . लॉक डाऊन उठवल्यानंतर  नव्या सालातील  पहिलीच मोठी चतुर्थी भरली असल्याने  अनेक व्यापारी दुकानदाराकडून समाधान व्यक्त होत होते . मंदिराच्या समोरील मुख्य  पेठेतील दुकाने हार , दुर्वा ,  पेढे ;श्रींच्या प्रतीमांनी  सजवली होती . तर हे घेण्यासाठी भावीकांची मंदीयाळी सुरु होती .रात्री उशिरापर्यंत चंद्रोदया पर्यंत गर्दीचा ओघ सुरू होता . चंद्रोदयाच्या वेळी होणाऱ्या आरती प्रसंगी असंख्य भक्त उपस्थित होते . रात्री उशिरापर्यंत सुमारे पन्नास हजार भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

......................................................
To Top