अखेर उत्सुकता संपली....बारामती पुरंदर आणि भोर यादिवशी होणार सरपंच पदाच्या निवडी : वाचा सविस्तर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
पुणे जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूका १५ जानेवारीला पारपडल्या. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूका ०९ व १० फेब्रुवारीला होणार आहेत. या निवडणूका नियोजित दिवशी व वेळेत घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना आज सोमवार दि. १ फेब्रुवारीला कढले आहेत. त्यामुळे गेली महिणा भरापासुन लागलेली उत्सुक्तता आता संपली आहे.
जिल्ह्यात नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतीत येत्या 9 व 10 फेब्रुवारी रोजी सरपंचपदाची निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या संदर्भात सर्व तहसिलदारांना आदेश देऊन सरपंच / उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून अव्वल कारकून, मंडल अधिकान्याची अथवा समकक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास सांगितले आहे.
कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात आल्या. यात जिल्ह्यात सरपंचपदाचे आरक्षण सोडत देखील करण्यात आले होते, परंतु शासनाने नंतर राज्यातील जाहिर झालेली सरपंच आरक्षण रद्द करून निवडणुका झाल्यानंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यास सांगितले.जिल्ह्यात नुकतेच नव्याने सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली असून, येत्या 9 व 10 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाच्या निवडणुका होणार आहेत.
दरम्यान,पुरंदर तालुक्यातील पिंगोरी, हवेली तालुक्यातील शेवाळेवाडी, औताडे-हांडेवाडी व बारामती तालुक्यातील माळेगांव या चार ग्रामपंचायतीमध्ये एक द्वितीयांशा इतकी सदस्य पदे निवडून आलेली नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक नेमणेबाबत संबंधीत गटविकास अधिकारी यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत.
COMMENTS