सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

मराठा क्रांती मोर्चा : आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी संघर्ष यात्रा

मराठा क्रांती मोर्चा : आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी संघर्ष यात्रा

पुणे : प्रतिनिधी

 मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या दोन दिवसांच्या संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही संघर्ष यात्रा ४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पुष्पहार अर्पण करुन यात्रेला सुरुवात होईल. आणि पुढे शिवाजीनगरमार्गे नगर रोड ,वाघोली, शिक्रापूर, अहमदनगर, अमळनेर, बीडमार्गे 5 फेब्रुवारी रोजी जालन्याला पोहचणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. 
         पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला राजेंद्र कोढंरे , रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कुंजीर,सचिन आडेकर, नाना निवंगुने ,हानुमंत मोटे,अनिल ताडगे,धनंजय जाधव,मीना जाधव, प्राची दुधाने,दिपाली पाडाळे, किशोर मोरे,यांसह समन्वयक उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी असून न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार असून आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव असा मराठा संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 
          मराठा मुलांच्या नोकर्‍यांच्या नियुक्त्या प्रलंबित असून मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले. सारथी बंद पाडली. त्यामुळे आपण परत एकवेळ एकजुट दाखविणे गरजेचे आहे. मराठा समाजाची ताकद राज्यकर्त्यांना दाखवावी लागेल. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार राज्यकर्त्यांना नसल्याने आपल्यालाच विचार करावा लागेल. जालना जिल्ह्यातील साष्ठ पिंपळगावातील मराठ्यांनी जो ठिय्या आंदोलनातुन संघर्ष सुरु केला आहे, त्यांना पाठिंबा देवुन या लढ्याला बळकटी देण्यासाठी मराठा बांधवांनी या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी केले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : मराठा क्रांती मोर्चा : आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी संघर्ष यात्रा
मराठा क्रांती मोर्चा : आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी संघर्ष यात्रा
https://lh3.googleusercontent.com/-WJ5exmVwOiE/YBkLoql25QI/AAAAAAAAGnQ/207eWCRlBAgZJ_wVxDcTxrSYtUxkCV_NgCLcBGAsYHQ/s1600/1612253906658154-0.png
https://lh3.googleusercontent.com/-WJ5exmVwOiE/YBkLoql25QI/AAAAAAAAGnQ/207eWCRlBAgZJ_wVxDcTxrSYtUxkCV_NgCLcBGAsYHQ/s72-c/1612253906658154-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/02/blog-post_2.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/02/blog-post_2.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy