१६ जानेवारी चा आदेश रद्द करत सहकारी संस्थांच्या निवडणुकीला हिरवा कंदील
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------
१६ जानेवारी २०२१ रोजीचा चा आदेश रद्द करत सहकारी संस्थांच्या निवडणुकीला परवानगी देण्यात आली आहे. सहकारी साखर कारखाने व जिल्हा बँका यांच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाली नसली तरी या निवडणुका लवकरच घेण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
राज्य सरकारने १६ जानेवारी २०२१ रोजी आदेश काढत सर्वच सहकारी संस्थाच्या निवडणुका ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आज पुन्हा नव्याने आदेश काढत या संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला आहे.