बाळासाहेब बारवकर यांना गुणवंत कामगार पुरस्कार : ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान

Admin
बाळासाहेब बारवकर यांना गुणवंत कामगार पुरस्कार : ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------

मुरूम ता बारामती येथील बाळासाहेब आबुराव बारवकर यांची गुणवंत कामगार म्हणुन निवड झाली. येत्या ९ फेब्रुवारी ला मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
        महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांचे "कामगार भुषण " आणि " गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार दिले जातात.                                           दरवर्षी वरील पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विभागातील कामगार क्षेत्रात काम करणारे कामगारांना शासनामार्फत दिले जातात यासाठी राज्यातुन अर्ज मागवून मुलाखती घेऊन दरवर्षी अंतिम ५०  ते ५५  कामगारांची निवड केली जाते ,सन्मानचिन्ह , १५ ते २५ हजार रोख आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप असते .सन -२०१६ व २०१७ चे पुरस्कार मागील वर्षी जाहीर झाले ,परंतु कोरोना प्रार्दुभावामुळे वितरण कार्यक्रम केला नाही ,हाच पुरस्कार वितरण सोहळा ०९ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी  ५:००वा मुख्यमंत्री आणि मान्यवर मंत्र्यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सेनापती बापट मार्ग मुंबई च्या सांस्कूतीक भवनात संपन्न होत आहे. या पुरस्कारासाठी सण २०१७ यावर्षासाठी पुणे जिल्हा ग्रामीण औद्योगीक क्षेत्र व बारामती तालुक्यातुन  बाळासाहेब आबुराव बारवकर   एकमेव गुणवंत कामगार म्हणुन निवड झाली आहे ,बारवकर हे सध्या निंबुत-निरा येथील ज्युबिलंट लायफसायसेन्स या पेट्रोकेमिकल या कंपनीत गेली ३० वर्ष इंजिनिअरींग विभागात सुपरवायझर या पदावर कार्यरत आहेत.ज्युबिलंट कंपनी स्थापनेपासुनचे पहिलेच एकमेव कामगारास हा सन्मान प्राप्त झाला आहे.
To Top