पेट्रोल इंधन दरवाढी विरोधात भोर शिवसेनेच्या वतीने निवेदन
माणिक पवार
भोर : प्रतिनिधी
केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल इंधन दरवाढीच्या विरोधात भोर तालुका शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी भोर तहसीलदार अजित पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दरवाढ कमी न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्र्वर शिंदे, माजी उपसभापती अमोल पांगारे, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी आदित्य बोरगे, भोर शहरप्रमुख नितीन सोनावले, विभागप्रमुख ज्ञानेश्र्वर मांढरे, उपविभागप्रमुख पपू राजीवडे, सचिन जेधे आदी उपस्थित होते. केंद्रीय अर्थ संक्ल्पेनंतर राज्यात महागाईचा भडका उडाला असून घरगुती वापराच्या गेस सिलेंडरचे दर २५ रुपयांनी तर पेट्रोल डीझेलचे एकाच महिन्यात जवळपास अकरावेळा दरवाढ वाढवली असल्याने याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना आणि शेतकरी वर्गाला प्रामुख्याने बसणार आहे. केंद्र सरकारने गस सिलेंडर, पेट्रोल डिझेलचे दर कमी कमी करावी तसेच तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
COMMENTS