सोमेश्वर आयसीयु हॉस्पिटलमध्ये २५ टक्के सवलतीत आरोग्य तपासणी : ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर आयसीयू हॉस्पिटल मार्फत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये हिमोग्लोबिन, शरीरातील पेशींचे प्रमाण, शुगर तपासणी, किडनी तपासणी, लिव्हर तपासणी, युरेन तपासणी, थायरॉईड तपासणी, आशा प्रकारे संपूर्ण शरीराची तपासणी केली जाणार आहे, या तापासणीवर २५ टक्के सूट दिली जाणर आहे. तसेच यामध्ये तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला दिला जाणार आहे. ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान हे शिबिर आयोजित केलेले आहे. आता पर्यंत ४३ जणांनी या शिबिराची लाभ घेतला आहे. हे शिबिर वाघळवाडी येथील सोमेश्वर आयसीयू या ठिकाणी सकाळी १० ते ६ या वेळेत चालू आहे.
COMMENTS