चिंताजनक.... बारामतीची रुग्ण संख्या वाढतेय : तीन दिवसात तीनपट वाढ
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसात बारामती तालुक्यासह आता कोरोना डोके वर काढू लागले आहे. गेल्या तीन दिवसात रुग्णांच्या संख्येत तीन पट वाढ झाली आहे. आज शहरात 26 तर ग्रामीण भागात 11एवढया जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कालचे शासकीय (17/02/21) एकूण rt-pcr नमुने 140. एकूण पॉझिटिव्ह-17. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -28 त्यापैकी पॉझिटिव्ह -11. कालचे एकूण एंटीजन 22. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-09.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 17+11+09=37.
शहर-26. ग्रामीण- 11.
एकूण रूग्णसंख्या-6474
एकूण बरे झालेले रुग्ण- 6212
एकूण मृत्यू-- 145.