बापरे.....तीन दिवसात तब्बल तेराशे दाखले : आजअखेर ५० उमेदवारी अर्ज दाखल
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आणि इच्छुकांच्यात एकच उत्साह संचारला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कारखान्याचा थकबाकी नसलेला दाखल लागतो हा दाखला काढण्यासाठी इच्छुकांनी रंगाच्या रांगा लागल्या. तीन दिवसात तब्बल १३०० सभासदांनी दाखले काढले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
सोमेश्वरच्या निवडणुकीसाठी १५ ते २२ फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून २३ ला अर्जांची छानणी होणार आहे. २४ ला याद्या प्रसिध्द होणार असून २४ ते १० मार्च दरम्यान अर्ज मागे घेता येणार आहेत. २१ मार्चला ला मतदान आणि २४ ला मतमोजणी होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी १७ आणि बुधवारी ३२ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती दादासाहेब कांबळे यांनी दिली. राष्ट्रवादी कडून मोठ्या संख्येने इच्छुक असलेल्या उमेदवारांनी गुरूवार(दि.१८) चा मुहूर्त शोधला असून गुरुवारी सर्वाधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
थकबाकी नसल्याबाबबचे दाखले घेऊन जाण्यासाठी कारखान्याच्या कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून सभासदांच्या रांगा लागत असून आजपर्यंत सरासरी १३०० दाखले कार्यालयातून गेले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
बारामतीचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार(दि.१५) पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून तीन दिवसात ५० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.