सर्व पक्षांची मोट बांधत भाजप पहिल्यांदाच सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुक रिंगणात

Admin
3 minute read
सर्व पक्षांची मोट बांधत भाजप पहिल्यांदाच सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुक रिंगणात 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेल उभे करत भारतीय जनता पक्ष सोमेश्वर परिवर्तन पॅनेल च्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे मत भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे व भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी स्पष्ट केले. 
         आज सोमेश्वर कारखाना निवडणूक संदर्भात सोरटेवाडी येथे भाजपसह सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप खैरे, माळेगाव चे संचालक adv बी जी गावडे, भाजपचे सातारा जिल्हा समनव्यक खंदारे, बारामती पश्चिम भागातील युवा नेतृत्व
इंद्रजित भोसले, सुशांत सोरटे, पांडुरंग कचरे, सोमेश्वर माजी संचालक पी के जगताप, शिवसेना युवा नेते दयानंद चव्हाण, खलील काझी, हनुमंत शेंडकर, सूर्यकांत गायकवाड, भाऊसो हुंबरे, नजीरभाई शेख, सुनील माने, बापूराव फणसे, विनोद खोमणे,  शेखर वडने, युवराज तावरे, माऊली सातव, बाळासाहेब भोसले, काका निगडे,  यांच्यासह बारामती, पुरंदर, फलटण आणि खंडाळा या तालुक्यातून प्रमुख कार्यकते उपस्थित होते. 
 
गणेश भेगडे- पुणे जिल्हाध्यक्ष भाजप
शिवसेना, रासप तसेच इतर समविचारी पक्षातील लोकांना एकत्र करत सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागेवर आम्ही उमेदवार उभे करणार आहे.
 यातील सहकारी साखर कारखानदारीतील अभ्यासु उमेदवारांना एकत्र करत एक मजबूत पॅनेल उभे करणार आहे. त्याच बरोबर पुणे जिल्हातील
जिल्हा बँक तसेच सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकात भाजप पॅनल उभे करणार आहे. 

जालिंदर कामठे- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाजप
भाजप व समविचारी पक्षांना एकत्र करत सोमेश्वर च्या निवडणुकीत ताकतीने पॅनेल उभे करणार आहोत. काकडे गट आणि राष्ट्रवादी पक्षाला बाजूला ठेऊन सभासदांना एक चांगला पर्याय देत आहोत. मोदी सरकारने साखर कारखानदारी बाबत सर्वच चांगले निर्णय घेतले आहेत, साखरेला हमीभाव, frp, इथेनॉल निर्णय या सरकारच्या कृषी बाबत सर्वच चांगले निर्णय घेतले आहेत.  सोमेश्वर च्या पाच ही गटात २१ उमेदवार उभे करणार असून यामध्ये काकडे गटातील कोण आले तर त्यांनाही सामावून घेऊ. 
दिलीप खैरे- माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे
यांच्या नेत्यांच्या प्रतिष्ठा जपण्यासाठी यांनी सोमेश्वर चा खेळखंडोबा लावला आहे. सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती हे तिन्ही कारखाने एका छताखाली घेण्याचे आणि यांच्यावर दराबाबत दबाव टाकून खाजगीला कमी दर काढायचे. गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी अनेक चुका केल्या आहेत. सभासदांचा सत्ताधाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी आम्ही हा पर्याय उपलब्ध करून देत आहोत.

To Top