धक्कादायक....घरचे मोबाईल घेऊ देत नाहीत म्हणून आत्महत्या : वाल्हे येथील प्रकार
वाल्हे: प्रतिनिधी
येथील सिध्दार्थ नगर शेजारील दोडके वस्ती मधील एका नववीत शिकणाऱ्या मुलाने घरचे मोबाईल घेऊन देत नाही म्हणून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली.
आदित्य रविद्र दोडके (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य, आई वडील व आजीकडे मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह करत होता. मात्र, ते मोबाइल घेऊन देण्यास नकार देत होते. शनिवारी सकाळी आजीने त्याची समजुत काढत दोन महिन्यांची पेन्शन आली की लाईटबिल भरू आणि तुला मोबाइल विकत घेऊ अशी समजूत काढली. मात्र, रूसलेल्या आदित्यने सकाळीच घरातील एका खोलीचा दरवाजा बंद करुन साडीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.