भोरच्या दुर्गम भागातील रायरी गावाने पटकावला स्मार्ट ग्राम पुरस्कार

Admin
भोरच्या दुर्गम भागातील रायरी गावाने पटकावला स्मार्ट ग्राम पुरस्कार 

माणिक पवार                           
भोर : प्रतिनिधी

भोर तालुक्यातील दुर्गम भागातील  विसगाव खोऱ्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने स्मार्ट ग्राम (आर.आर पाटील सुंदर गाव ) या पुरस्काराने भोर तालुक्यातील रायरी ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला असून विविध स्तरातून तत्कालीन सरपंच व विद्यमान सरपंच प्रशासनाचे अभिनंदन होत आहे 

भोर तालुक्यातील एकूण १५५ ग्रामपंचायती असून या सर्वांमधून २०१८/१९ या सालातील सुंदर गाव पुरस्कार हा रायरी गावाला मिळालेला आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. पुणे येथील अल्पबचत भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विद्यमान सरपंच वर्षा किंद्रे माजी सरपंच सूर्यकांत किंद्रे ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला तर यामध्ये सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि दहा लाख रुपयांचे बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्थानिक प्रशासन आणि तत्कालीन सरपंच सूर्यकांत किंद्रे, ग्रामसेवक पदमाकर डोंबाळे, उपसरपंच ग्रामस्थ इतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गाव स्तरावर राबवलेल्या विविध शासकीय योजना, नागरी सुविधा आरोग्य, शिक्षण, कचरा, सांडपाणी, आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध स्तरांवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सन २०१८ १९ सालचा सुंदर गाव पुरस्कार रायरी गावाला मिळाला असून भोर तालुक्यातील ससेवाडी ग्रामपंचायतीला सन २०१९/२० सालचा तर बारेबुदुक गावाला सन २०२०/२१ सालचा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला आहे. त्यांचाही गौरव उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला आहे रायरी,ससेवाडी व बारेबु ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाल्याबददल तालुकास्तरातुन अभिनंदन होत आहे.


To Top