सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मंजुळा, सत्यम्, शिवम्, सुंदरम्, पंचरत्न व सहयाद्री महिला बचत गट वाकी ३१-०१-२०२१ रोजी हळदी कुंकू समारंभ वाकी (जगताप वस्ती) येथे सायंकाळी साजरा झाला. बचत गटाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत वाकी मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या महिलांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. तसेच सौ सुनिता गाडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाबद्दल सत्कार करण्यात आला. बचत गटाचे संस्थापक मार्गदर्शक बाळासाहेब जगताप यांनी महिलांना मार्गदर्शक केले. सहा बचत गटांची एकूण बचत ३०,०००,००/- रूपये झाली आहे. एकून सभासद संख्या २१२ झाली आहे. सभासद महिलांसाठी दवाखाना मदत योजना, दीपावलीचा किराणा साहित्याचे वाटप केले जाते यांची माहिती दिली, बचत गटामधील सर्व महिला स्वावलंबी झाल्या आहेत, बँकेकडून एक ही रुपये कर्ज घेतले नाही. बचत गट महिलांनसाठी आधारस्तंभ बनला आहे. कोरोना मुळे गेल्या वर्षी रद्द झालेला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम या वर्षी घेण्यात येईल असे सांगितले. राणी जगताप यांनी आभार मानले