निंबुत च्या उद्याच्या सरपंच निवडीला १६ पर्यंत स्थगिती : सतीश काकडे यांच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
बारामती तालुक्यातील निंबुत (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाबाबत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. याप्रसंगी न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत सरपंच निवड स्थगित ठेवण्याचे आदेश आज दिले होते. त्यामुळे १६ फेब्रुवारीपर्यंत बारामती तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतिच्या सरपंच-उपसरपंच निवडी स्थगित ठेवल्या असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी बजावले आहेत. सदर गावच्या सरपंच निवडीवर स्थगिती आल्याने बारामती तालुक्यातील ९ व १० फेब्रुवारी रोजी सरपंच-उपसरपंच निवडीच्या सर्व गावंच्या प्रक्रिया स्थगित ठेवल्या आहेत. तसेच आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी यांच्यासमोर सरपंच आरक्षणाबाबतच्या हरकतीवर सुनावणी होणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले आहेत.
COMMENTS