मोढवे गावातील खडी क्राशर बंद करा: अन्यथा ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Admin
मोढवे गावातील खडी क्राशर बंद करा: अन्यथा ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बारामती : सोमेश्वरनगर

बारामती तालुक्यातील मोढवे गावाच्या परिसरामधील तीन खडी क्रेशर राजू चालू आहेत आणि खडी वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्या मुळे मोढवे गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे व मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे राज्य शासनाने बनवलेल्या रस्त्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे त्यामुळे तेथील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे तरी सततच्या स्फोटामुळे घरांना तडे गेले आहेत अनेक मंदिरांना तडे गेले आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय शेतामध्ये शेतकरी काम करीत असताना उडणाऱ्या धुळीमुळे शेतात काम करणेही अवघड झाले आहे या स्फोटामुळे या परिसरामध्ये पाण्याची पातळी देखील मोठ्या प्रमाणात घटली आहे त्यामुळे आमच्या जमिनी खराब होत चालल्या आहेत आम्ही कसे जगायचे आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच लहान मुलांनाही त्याचा खूप मोठा त्रास होत आहे याचा त्यामुळे  गाव सोडण्याची वेळ आमच्यावर होऊ शकते अशी भीती येथील शेतकर्‍यांना वाटत आहे आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी शेतकरी करीत या  संदर्भामध्ये तहसीलदार बारामती यांना २४ डिसेंबर २० रोजी निवेदन दिले होते मात्र सदर पत्रावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यानंतर परत परत उपविभागीय अधिकारी यांना २१ जानेवारी २१ रोजी निवेदन देण्यात आले होते.त्यानंतर २ फेब्रुवारी २१ रोजी  रोजी प्रांत कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषण केले होते तरी कोणतीही कारवाई झाली नाही त्या संदर्भात प्रदूषण नियामक मंडळ पुणे यांना कळवले आहे परंतु त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून  येत्या पंधरा दिवसांत खडी क्रशर वर कारवाई न झाल्यास ३ मार्च रोजी आपल्या कार्य समोर धरणे आंदोलन करण्यात येईल. असे यावेळी सोलनकर यांनी सांगितले. या निवेदनावर माणिकराव काळे, संपतराव टकले यांच्या सह्या आहेत
To Top