निंबुत ग्रामपंचयातच्या सरपंचपदी निर्मला काळे तर उपसरपंचपदी अमर काकडे

Admin
निंबुत ग्रामपंचयातच्या सरपंचपदी  निर्मला काळे तर उपसरपंचपदी अमर काकडे

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------

बारामती तालुक्यातील निंबुत ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निर्मला संतोष काळे तर उपसरपंचपदी अमर चंद्रशेखर काकडे यांची निवड करण्यात आली. 
            आज निंबुत येथे नवनिर्वाचित सदस्यांची मासिक सभा पार पडली यामध्ये ही निवड करण्यात आली. यावेळी आरती किरण काकडे,  शिरिष ज्ञानदेव काकडे, सुवर्णा चंद्रकांत लकडे,  रविंद्र सोमनाथ जमदाडे, विध्यादेवी सतिश काकडे, नंदकुमार छबनराव काकडे, योगिता सतिश दगडे, कुसुम विजयराव काकडे,  निर्मला मनोहर बनसोडे, प्रमोद बाबासो बनसोडे, वैशाली लालासाहेब काकडे, सुरेश मोतीराम आत्तार,  उषा शामराव पवार सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भैरवनाथ पॅनेलला ९ तर सोमेश्वर विकास पॅनेलला ६ जागा मिळाल्या या सहा जागा मिळाल्या. मात्र निंबुत चे सरपंचपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने या आरक्षित जागेवर विरोधी गटाच्या उमेदवार निर्मला काळे या निवडून आल्याने नऊ जागा निवडून येऊनही भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या पदरी निराशा आली.  मात्र अवघ्या ६ जागा निवडून आलेल्या सोमेश्वर परिवर्तन पॅनेलच्या गटाला सरपंचपदाची संधी मिळाली. अनेक तपानंतर निंबुतच्या सरपंचपदाची माळ विरोधी गटाच्या गळ्यात पडली आहे.
           निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी एन मिसाळ यांनी काम पाहिले त्यांना तलाठी खोमणे व ग्रामसेवक बालगुडे यांनी सहकार्य केले.
To Top