लाटे ग्रामपंचायतीवर 'महिलाराज' : सरपंचपदी शीतल खलाटे तर उपसरपंचपदी उषा खोमणे

Admin
लाटे ग्रामपंचायतीवर 'महिलाराज' : सरपंचपदी शीतल खलाटे तर उपसरपंचपदी उषा खोमणे

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील लाटे गावातील प्रस्थापितांना धूळ  लाटे गावच्या सरपंचपदी आयटी इंजिनिअर शीतल अनुराग खलाटे तर उपसरपंचपदी उषा सोमनाथ खोमणे यांची निवड करण्यात आली आहे.  
          सत्ताधारी पॅनलचा ८-१ ने धुव्वा उडवत
श्री पुण्यमाता आईसाहेब ग्रामविकास परिवर्तन पॅनलने निर्विवाद सत्ता स्थापन केली. या पॅनेल चे नेतृत्व सोमेश्वर सहकारी साखर कारख्यानाचे संचालक  सचिन खलाटे आणि  माजी संचालक नानासो खलाटे यांनी केले 
यावेळी सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मनीषा खलाटे, वंदना ताकवले, माधुरी खलाटे, कुमार ननवरे उमेश साळुंखे, संग्राम बोई तसेच तलाठी बी एस वावळ ग्रामसेवक वि टी चव्हाण व लाटे गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पारधी यांनी काम पाहिले. 
To Top