खळबळजनक.......नीरा नजिक पाडेगाव समता आश्रम शाळेतील बारा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
लोणंद : प्रतिनिधी
नीरा नजिक पाडेगाव (ता.खंडाळा) येथील मांगल्य शिक्षण प्रसारक मंडळच्या समता आश्रम शाळेतील बारा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य तपासणी दरम्यान स्पष्ट झाले आहे.
सध्या कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललेला आहे. खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील समता आश्रम शाळेच्या बारा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण असल्याचे लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या सर्व बाराही विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसल्याने त्यांना आश्रम शाळेतीलच संस्थात्मक विलिगीकरण कक्षात ठेवलेले आहे. तसेच काल चाळीस विद्यार्थ्यांचे घेतलेले नमुने आज निगेटीव्ह आले असून उर्वरित विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होवु नये म्हणुन उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
खंडाळा तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे की कोणीही विना मास्क सार्वजनीक ठिकाणी फिरु नये. तसेच सोशल डिस्टंस पाळणेत यावा. सार्वजनीक ठिकाणी कोणत्याही प्रकारची गर्दी करु नये. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.