वाणेवाडी ग्रामपंचयात कर्मचाऱ्यांना मिळणार मागील फरकासह वाढीव पगार : बीडीओचे आदेश
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
ग्रामपंचायत कर्मचा-यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता भविष्य निर्वाह निधी थकबाकीसह देण्यात येधून यापुढे दरमहा देण्यात यावे असा आदेश बारामतीचे गटविकास अधिकारी यांनी वाणेवाडी ग्रामपंचायतीला दिले आहेत.
याबाबत वाणेवाडी येथील ग्रामस्थ गोपाळ चव्हाण यांनी ग्रामपंचायत कामगारांना नियमानुसार वेतन मिळावे याबाबत गट विकास अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. यावर गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचयात वाणेवाडी यांना दिलेल्या पत्रात म्हनटले आहे की, कामगार उपआयुक्त.मुंबई दिनांक ५/८/२०२० आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),जि पुणे यांचे कडिल दिनांक २३/०८/२०१५ अन्वये किमान वेतन अदा करणे या व्यतिरिक्त राहणीमान भत्ता / भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत निधीतून पूर्णतः देणे क्रमप्राप्त आहे. ग्रामपंचायतीकडुन ग्रामपंचायत कर्मचा-यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता भविष्य निर्वाह निधी थकबाकीसह देण्यात येऊन यापुढे दरमहा नियमितपणे देण्याबाबत पत्रात नमूद केले आहे. तरी पत्राच्या अनुषंगाने ग्रामपंचायत अधि नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.