थोपटेवाडीच्या सरपंचपदी रेखा बनकर तर उपसरपंचपदी कल्याण गावडे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोहाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा दत्तत्रिय बनकर तर उपसरपंचपदी कल्याण विलास गावडे यांची निवड झाली.
थोपटेवाडी ग्रामपंचायतीची सरपंच निवड
ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी
आर.डी.पारधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी निवडणूक प्रक्रियेत चांगलीच रंगत पहायला
मिळाली. गावात २ पक्ष एकमेकांसमोर उभे होते. यामध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला ८ तर तुकाईमाता पॅनेलला १ जागा मिळाली होती. सरपंच पदासाठी एकमेव रेखा बनकर यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. उपसरपंच पदासाठी कल्याण गावडे व पृथ्वीराज नलवडे या दोघांचा अर्ज दाखल झाल्याने निवडणूक घेण्यात आली. यामध्ये कल्याण गावडे यांना ७ मते मिळाली तर पृथ्वीराज नलवडे यांना २ मते मिळाली.