.....त्या १६ संचालकांची बँक खाती सुरू करण्याची परवानगी : वाघळवाडी सोसायटी अपहार प्रकरण
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज --------
वाघळवाडी(ता. बारामती) येथील वाघळवाडी सोसायटीत अपहाराचा ठपका असलेल्या १६ संचालकांची बँक खाती पुणे जिल्हा बँक सोमेश्वरनगर या शाखेने सुरू केली. मंगळवार(दि.९) पासून ही खाती सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अविनाश सावंत, समर्थ ज्ञानपीठ चे अध्यक्ष अजिंक्य सावंत, वाघळवाडी ग्रामपंचायत चे सदस्य हेमंत गायकवाड, तुषार सकुंडे, सोसायटीचे संचालक अनिल शिंदे, व समीर जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामतीचे सहाय्यक निबंधक तसेच वडगाव निंबाळकर पोलिसांत निवेदन दिले होते.
यामध्ये वाघळवाडी सोसायटीमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अन्वये एन. एच. ताजमत यांच्या मार्फत चौकशी झाली होती. त्यानुसार सर्व संचालक मंडळ यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. सदर संचालक मंडळ यांच्याकडून कोणत्याही स्वरुपाची येणे बाकी नाही, असा अहवाल सादर केलेला आहे. तत्कालीन सर्व संचालक मंडळाची खाती लवकरात लवकर चालू करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली होती.
या संचालकांची खाती होणार सुरू
कल्याण नथाराम तुळसे ,अर्जुन कृष्णा सावंत, संपत दशरथ सावंत, भगवान श्रीरंग जाधव, बापू काशिनाथ जाधव, अशोक गणपत सावंत, बबन साहेबराव गायकवाड, तुकाराम नामदेव साळुंखे, गोपाळ केसू गायकवाड, आनंदराव पांडुरंग सावंत , श्रीरंग बयाजी मोहिते, विठठल नाना सावंत, किसन
आबा सकुंडे, एकनाथ बयाप्पा सकुंडे, नंदा राजकुमार सकुंडे, कलावती आप्पासाहेब जाधव.
वरील १६ संचालकांचे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सोमेश्वरनगर शाखेतील बचत खातेचे व्यवहार पोलीस कारवाई दरम्यान वडगांव पोलिसांनी बंद केली होती. याबाबत सहायक निबंधक सहकारी संस्था बारामती यांनी वरील संस्थेच्या संचलाकाची चौकशी करून दोषमुक्त केले असल्याचे पत्र दिल्याने बॅंकेने या संचालकांचे व्यहवार पूर्ववत करावेत असे वडगाव निंबाळकर पोलिसांनी बँकेला कळविले आहे.