अबब....पहिल्याच दिवशी तब्बल एवढ्या जणांनी काढले दाखले : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक अर्ज दाखल
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----
सोमेश्वर सहकारी साखर निवडणुकीसाठी आज पासून अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ४२७ इच्छुक उमेदवारांनी सोमेश्वर कारखान्यातून थकबाकी नसल्याचा दाखले काढले आहेत.
सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकित १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी आहे. यामध्ये आज पहिल्याच दिवशी ४२७ सभासदांनी सोमेश्वर कारखान्यातून थकबाकी नसल्याचा दाखले नेले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून इच्छुकांची मांदीयाळी
काल वाणेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला त्यावेळी हजार च्या वर इच्छुकांनी आपली उपस्थित दर्शवली. पहिल्याच दिवशी ४२७ दाखले गेल्याने इच्छुकांना थोपवण्यात पक्षश्रेष्ठींची दमछाक होणार आहे.
दिवसभरात केवळ एकच अर्ज दाखल
आज सकाळ पासून दुपारी तीन वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचाच एकमेव अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.