'टायगर अभी जिंदा है' म्हणत शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून काकडे यांचा फोटो व्हायलर

Admin
'टायगर अभी जिंदा है' म्हणत शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून काकडे यांचा फोटो व्हायलर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्यूज-----

शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे हे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक  लढवणार असल्याचे जाहीर करताच कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्यात एकच उत्साह संचारला आणि सतीश काकडे यांच्या फोटोला ' टायगर अभी जिंदा है' कॅपशन देत फेसबुक, व्हाट्सअप आणि इन्स्टग्रामवर या फोटोने एकच धुमाकूळ घातला. 
           सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लढवणार नसल्याचे काकडे यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र आज निंबुत या ठिकाणी झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने काकडे यांनी सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कृती समितीला पुन्हा संजीवीनी मिळाल्याचे काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.
          या निवडणुकीत पहिला अर्ज सतीश काकडे यांचा दाखल होणार असून शेतकरी कृती समितीच्या वतीने इच्छुक सभासदांना निवडणुक अर्ज भरण्यास सांगितले असून २२ फेब्रुवारी पर्यंत अर्ज कृती समितीच्या कार्यालयात दाखल करावेतअसे सांगितले आहे. कृती समितीच्या वतीने कार्यकत्यांची बैठक  बोलविली जाणार असून त्यावेळी समविचारी पक्षांना एकत्र घेवुन पुढील दिशा ठरविली जाईल असे काकडे यांनी स्पष्ट केले आहे. 
सतीश काकडे- अध्यक्ष पुणे जिल्हा शेतकरी कृती समिती 
सोमेश्वर  कारखान्याचे चेअरमन यांचा मनमानी कारभार, सभासदांना विश्वासात न घेणे, कृती समितीच्या मागण्यांना कोणताही प्रतिसाद न देणे अशा प्रकारच्या कारभारामुळे, उध्दट वागण्यामुळे व शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखुन मी निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.


To Top