कार्यकर्त्यांच्या अग्रहास्तव सतीश काकडे 'सोमेश्वर' च्या निवडणूक रिंगणात : कृती समितीचा पॅनेलच्या हालचाली सुरू
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी कृती समिती सर्व जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहे. याबाबत आज निंबुत येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात एकमुखाने निर्णय घेण्यात आला.
मात्र कार्यकर्त्यांचा आग्रस्तव सतीश काकडे हे स्वतः निवडणूक रिगणात उतरणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने आज सोमवार दि.१५ रोजी निंबुत येथे कार्यकर्ता मेळावा
पार पडला कार्यकर्त्यांनी सतीश काकडे यांचा कारखान्याच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी कृती समितीच्या वतीने प्रथम फार्म भरण्याचा एकमताने ठराव मंजुर केला व त्यानंतर कार्यकत्यांनी आपआपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये अजय कदम,
शहाजीराव जगताप, आप्पासाहेब गायकवाड, रणसिंग पवार, समिर जाधव, माऊली
धुमाळ, किरण साळुखे, शिवाजीराव नाझीरकर, हरिभाऊ तावरे, समिर खलाटे,
बाबासाहेब शिंदे, अॅड तानाजीराव गायकवाड, अजितराव माळशिकारे, रूषीकेश धुमाळ,
प्रमोद फडतरे, राहुल जगताप असे सुमारे ५०० ते ६००
सभासद यावेळी उपस्थित होते. या मेळाव्याचे अध्यक्ष श् कल्याण भगत होते. सतिश काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांचा मनमानी कारभार, सभासदांना विश्वासात न घेणे, कृती समितीच्या मागण्यांना।कोणताही प्रतिसाद न देणे अशा प्रकारच्या कारभारामुळे, उध्दट वागण्यामुळे व शेतकरी कृती
समितीच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखुन मी निवडणुक लढविण्याचा निर्णय घेत आहे
असे जाहिर केले व शेतकरी कृती समितीच्या वतीने इच्छुक सभासदांना निवडणुक अर्ज भरण्यास
सांगितले असुन मी माझी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकी संबंधीची भुमिका यापुर्वीच स्पष्ट
केली होती. तरी इच्छुक सर्व सभासदांनी निवडणुक फॉर्म दि.२२/२/२०२१ पर्यंत भरून त्याची
पोच पावती कृती समितीच्या कार्यालयात दाखल करावी असे मार्गदर्शन केले. तसेच दि.।२३/२/२०२१ रोजी छाणणी नंतर कृती समितीच्या वतीने कार्यकत्यांची मिटींग बोलविली जाईल।व त्यावेळी समविचारी पक्षांना एकत्र घेवुन पुढील दिशा ठरविली जाईल असे काकडे यांनी स्पष्ट केले.