आजच्या शेतकरी कृती समितीच्या मेळाव्याकडे लक्ष : सतीश काकडे काय घेणार निर्णय
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----
काल दि १४ रोजी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा वाणेवाडी येथे पार पडला. तर थोड्याच वेळात १० वाजता शेतकरी कृती समितीचा मेळावा निंबुत या ठिकाणी पार पडणार आहे.
काल वाणेवाडी येथे पार पडलेल्या मेळाव्यास एक हजाराच्या वर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रास्ताविक केले तर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेत उमेदवारी अर्ज कसे दाखल करावेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
तर आज शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी निंबुत या ठिकाणी मेळावा आयोजित केला असून यामध्ये काकडे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
COMMENTS