वाणेवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या : गटविकास अधिकाऱ्यांना पत्र
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
बारामती तालुक्यातील वाणेवाडी ग्रामपंचयात कर्मचाऱ्यांना उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने निश्चित केल्याप्रमाणे किमान वेतन, राहणीमान भत्ता मिळावा अशी मागणी वाणेवाडी येथील ग्रामस्थ गोपाळ चव्हाण यांनी बारामतीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
चव्हाण यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
कामगार उपआयुक्त (ग्रा.वि.).समक्ष प्राधिकारी,किमान वेतन निर्णयानुसार ग्रामपंचायत कर्मच्या-यांना उद्योग उर्जा व कामगार विभागाने निश्चित केलेले किमान वेतन अदा करणे, ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. या किमान वेतनाव्यतिरिक्त राहणीमान भत्ता / भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायतिने त्यांचे ग्रामनिधीतून पूर्णतः देणे क्रमप्रास आहे.
ग्रामपंचायतिकडून ग्रामपंचायत कर्मच्या-यांना किमान वेतन व राहणीमान भता । भविष्य निर्वाह निधी यापुढे दरमहा नियमितपणे देण्याबाबत योग्य त्या सूचना आपल्या कडून करण्यात यावी. असे पत्रात म्हटले आहे.