आज कहीं खुशी कहीं गम : सोमेश्वर कारखाना निवडणूक आज अर्ज छाननी

Admin
आज कहीं खुशी कहीं गम : सोमेश्वर कारखाना निवडणूक आज अर्ज छाननी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणीकित आज सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार असून कोणाचे अर्ज राहणार आणि कोणाचे बाद होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
            दि १५ फेब्रुवारी पासून सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. काल दि २२ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटच्या दिवशी करखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इच्छुक उमेदवारांनी तब्बल ६३८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शेतकरी कृती समितीच्या वतीने ५५ तर भाजप व मित्रपक्षाच्या वतीने ३५ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 
            मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांचा विचार करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डोकेदुखी ठरणार आहे. यावेळी तब्बल ६३८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अर्ज छाननी करताना देखील प्रशासनाची दमछाक होणार आहे. संचालक पदाचे स्वप्न उराशी बाळगून उमेदवारी अर्ज जर छाननीत बाद झाले तर इच्छुक उमेदवारांचे संचालक पदाचे स्वप्न भंगणार आहे.
To Top