देऊळगाव रसाळ ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी तालुका युवकचे अध्यक्ष राहुल वाबळे यांची विजयाची हॅट्रीक
सुपे प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ ग्रामपंचायतीमध्ये बारामती तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राहुल वाबळे यांच्या गटाने विजयाची हॅट्रीक मिळवली आहे . तालुक्यातील 52 ग्रामपंचायती पैकी चुरशीची ठरलेली ही देऊळगावची निवडणूक होती. या वेळी दोन्ही बाजूच्या गटामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत दोन्ही पॅनल होते. यामध्ये अध्यक्ष गट व विरोधात बारामती तालुका दूध संघाचे संचालक सुरेश रसाळ व बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अंकुश रसाळ असे संघर्षमय पॅनल होते. तसेच निवडणुकी मध्ये दोन्ही गट समसमान होऊन अपक्ष विजयी उमेदवाराच्या खांद्यावर सर्व भार होता परंतु युवक अध्यक्षांच्या गटाने योग्य वेळी सर्व धुरा हातामध्ये घेऊन आपली तीन वर्षाची परंपरा अबादीत ठेवली आहे.
या वेळी देऊळगावच्या सरपंच पदी वैशाली वसंत वाबळे उपसरपंच पदी दत्तात्रय माधवराव वाबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे तसेच बहुमत सदस्यांसाठी मनीषा संतोष वाबळे, सल्लाउद्दीन गफूरभाई इनामदार तसेच अपक्ष उमेदवार सुनंदा मेनिनाथ उदावंत यांनी आपले निर्णायक मत युवक अध्यक्ष याच्या गटाला देऊन राहुल वाबळे यांनी आपले वर्चस्व राखले आहे ,
राजकारण हे ठराविक काळापुरते असते ते सर्व विसरून गावाचा सर्वाणगिक विकासाठी सर्वाचा साथिने प्रयत्न करणार सर्व ग्रामस्थांचे आभार
राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष - राहुल वाबळे