दौंड तहसील कार्यालयातील लिफ्ट अखेर सुरू : अपंग क्रांतिसेनेच्या मागणीला यश

Admin
दौंड तहसील कार्यालयातील लिफ्ट अखेर सुरू : अपंग क्रांतिसेनेच्या मागणीला यश

यवत : प्रतिनिधी,

दौंड तहसील कार्यालयातील कित्येक दिवस बंद असलेली लिफ्ट मंगळवारी सुरू झाली आहे.                कामानिमित्त तालुक्यातुन येणा-या दिव्यांगांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .अनेक वेळा तोंडी मागणी करूनही दौंड तहसील कार्यालयातील प्रमुख याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अपंग क्रांतीसेनेचे कार्यकर्त्यांनी केला आहे.तहसील कार्यालयात महसुलची शिलकी खाते दुस-या मजल्यावर आहेत.महत्वाच्या मिटींगला तालुका दंडाधिकारी बहुताश दुस-या मजल्यावरच बसत असतात.परंतु गेले कित्येक दिवस नादुरूस्त अवस्थेत असलेली लिफ्ट दुरूस्त करण्यास प्रशासन जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असलेला आरोप अपंग क्रांतीसेनेने केला होता.त्याची दखल उशिरा का होईना दौंड तहसील कार्यालयाने घेतली आहे.   
To Top