'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या दीड वर्षांपासून सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीला मुहूर्त सापडत नसून तीन वेळा निवडणूक लागल्याचे जाहीर करत तीन वेळा रद्द केली आहे. आज राज्य शासनाने पुन्हा नवीन आदेश काढत सर्वच सहकारी संस्थाच्या निवडणूका ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलल्या आहे.
तिसऱ्या वेळी सोमेश्वर ची निवडणूक रद्द झाल्याने इच्छुकांच्या संचालक पदाच्या स्वप्नावर पाणी पडले आहे. कोविड च्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक पुढे ढकलल्याचे शासनाने या आदेशात म्हनटले आहे.
दिलीप खैरे- माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे
मी आजच उच्च न्यायालयात कारखान्याच्या निकषांबाबत लवकरच पिटीशन दाखल करनार असून कारखान्याला चुकीच्या याद्या बदलून पुन्हा नवीन मतदार याद्या लागणार आहेत. तसेच चुकीचे निकष बदलून निवडणूक प्रकिऱ्या देखील पुन्हा राबवावी लागणार आहे.