बारामतीकरांनो सावधान... रुग्ण संख्या वाढतेय
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
गेल्या एक ते दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर बारामती शहर आणि तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. काल दिवसभरात बारामती तालुक्यात १४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये शहरातील १२ तर ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
कालचे शासकीय दि १५ चे एकूण rt-pcr नमुने १२२
एकूण पॉझिटिव्ह-८.
प्रतीक्षेत ०.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -३.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१६ त्यापैकी पॉझिटिव्ह -२. कालचे एकूण एंटीजन २०. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-४.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १४
शहर-१२. ग्रामीण- २.
एकूण रूग्णसंख्या-६४१८
एकूण बरे झालेले रुग्ण- ६१८२
एकूण मृत्यू-- १४५.