सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
पुणे स्वारगेट येथील अत्याचाराची घटना ताजी असतानाच बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पीडित मुलींनी वडगाव निंबाळकर पोलिसात धाव घेतली आहे.
याबाबत पीडित युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोहीत नाथा गोडसे रा.आंबेडकरनगर-वाघळवाडी ता. बारामती व अमोल ऊर्फ राहुल बाळासाो जाधव रा. चोपडज ता. बारामती या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित युवती ही सायकलवर तिच्या मैत्रिणीसोबत शिक्षण घेण्यासाठी सोमेश्वरनगर येथे येत असताना दि. २८ फेब्रुवारी रोजी एका लाल रंगाची स्विफ्ट नं. एम एच ४२ बी.जे ५७९८ गाडीतून काही युवक तिचा पाठलाग करत होते. काही अंतरावर गेल्यावर चारचाकी गाडी आडवी मारत
त्यातील मुलाने मला थांबविले त्याने त्याचे कारची काच खाली घेवुन मला म्हणाला की, तु माझा मित्र अमोल यास खुप आवडते त्याचे सोबत तु अफेयर कर नाहीतर तुला आंम्ही दोघे याच गाडीतुन पळवुन घेवुन जाईन अशी धमकी देवुन पीडित युवतीच्या मनास लज्जा उत्त्पन्न होईल असे अश्लील वर्तन केले. त्यावेळी मी त्यास माझा पाठलाग करु नको मला कांहीएक करायचे नाही असे समजावुन सांगितले होते त्यानंतर तो कार करंजे गावाच्या बाजूकडे वळुन वेगाने निघुन गेला. मी घाबरुन घरी गेली घडलेला प्रकार माझे आई वडीलांना सांगितला.
त्यानंतर आज दि. ०१ मार्च २०२५ रोजी नेहमीप्रमाणे सायकलवर कॉलेजकडे आले त्यानंतर कॉलेज सुटलेल्यावर पीडित युवती व तिची मैत्रिण कॉलेजचे बाहेर असलेले बस स्टॉपकडे गेलो असता तेथे शिफ्ट कार नं. एम एच ४२ बी.जे ५७९८ ही थांबलेली होती. आंम्ही बस स्टॉपवर उभा असता कारमधुन दोन मुले बाहेर आली त्या दोघांनी पीडित युवतीकडे वाईट हेतुने एकटक पाहुन अश्लील हातवारे करुन पीडित युवतीची छेडछाड केली आहे.
पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन काळे, सपोउनि राहुल वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश नागटिळक करत आहेत.